PC आणि Laptop वरून WhatsApp कस वापरणार
नमस्कार मित्रानो मी विजय , आज मी घेऊन आलोय कि कश्या प्रकारे तुम्ही Whatsapp तुमच्या Laptop अथवा PC वर Connect कराल. मित्रानो फार अश्या ट्रिक्स आहे ज्या मधून तुम्ही हि प्रोसेस करू शकतात पण आम्ही अशी एक प्रोसेस तुमच्या समोर आणली आहे कि ती फार कमी स्टेप्स मध्ये आणि फार सोपी आणि सरळ आहे. चला तर मग सुरवात करूया.
स्टेप्स :-
- आधी तुमच्या मोबाईल मध्ये whatsapp ओपन करून घ्या.
- आता WhatsApp Web वर क्लिक करा.
- ( सूचना :- जर हे ऑप्शन नसेल तर तुमच WhatsApp Update करून घ्या आणि मगच हि प्रोसेस करा.)
- आता तुमच्या समोर स्कॅनर येईल एक चौकोनी बॉक्स.
![]() |
| web.whatsapp.com वरील फोटो |
- आता ह्या लिंक वर [क्लिक करा]
- वरील चित्रा प्रमाणे तुमच्या समोर एक कोड येईल
- आता तुमचा मोबाईल त्या कोड च्या समोरा समोर आणा.
- तो कोड तुमच्या मोबाईल च्या चौकोनी बॉक्स मध्ये फिट बसला पाहिजे ह्याच्यावर लक्ष द्या.
- कोड फिट झाल्यावर लगेच तुमच पूर्ण WhatsApp PC व Laptop वर दिसू लागेल.
महत्वाच्या सूचना :-
- तुमच WhatsApp वापरून झाल्यावर मोबाईल वरून Logout करण विसरू नका.
- त्या साठी WhatsApp Web वर क्लिक करा आणि Logout करा.
- ह्या ट्रिक साठी तुमचा मोबाईल अपडेट असण गरजेच आहे.
Tags : Whats App Marathi Tricks, New Whats App Marathi Tricks, Whats App Masti, Tricks Marathi, MarathiTricks.Com








0 comments:
Post a Comment